Monday, 28 November 2011

चारोळ्या- आज्ञा

चारोळ्या... छोट्या, सुबक पण अर्थपूर्ण.  श्री चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या वाचून प्रेरित होऊन मी हा छंद जोपासायला सुरवात केली. त्यांच्याच आशीर्वादाने काही शब्द मांडण्याचे प्रयत्न करत आहे. चूक भूल माफ असावी तरी आपण सर्व मला मदत कराल अशी अपेक्षा... 
ब्लोग मध्ये कवितांच्या अध्ये मध्ये फक्त 'चारोळी ' अश्या शेर्शका खाली अधून मधून टाकत राहीन... वाचा आणि कृपया आपले विचार मांडा... 

उगवत्या सूर्याची आज्ञा राखत..
                                   एक कोंबडा  आरवतो...
सूर्यास्ताच्या साक्षीने  बिचारा...
                                  कुणाचा तरी ढेकर बनतो...
                                                          श्रीहर्ष (२२ नोव्हेंबर २०११)

चालता चालता...

एकदातरी...

चालता चालता वाटलं ...
                                 एकदातरी
                  मागे वळून पहावं,
मिट्ट पसरलेल्या काळोखात...
                                 एकदातरी
                 हाक मारून पहावं...

प्रकाशाकडे झेप घेतांना...
                                 एकदातरी...
                    अंधारात गुदमरलेल्या भावंडांना ...
                                 एकदातरी...
                   मदतीचा हात देऊन पहावं...

पंच पक्वान्नांवर ताव मारतांना...
                                  एकदातरी...
                     भुकेलेल्यांना दोन घास देऊन पहावं...


स्वतःसाठी रोज जगतांना...
                                  एकदातरी
                      दुसर्यासाठी काहीतरी करून पहावं

स्वार्थाच्या मायेला झटकून...
                                  एकदातरी...
                   परमार्थाची ऊब ओढून पहावं...


जखमांनी वेढलेल्या या जगात...
                             .. एकदातरी...
                    कुणाची तरी  खपली होऊन पहावं...
     
                                   श्रीहर्ष (२२ नोव्हेंबर २०११)


Friday, 11 November 2011

शब्द


शब्द  

शब्दात  कथा ,
शब्दात  कोडे ,
शब्दात  कविता ,
              तुझ्या  अन  माझ्या ...

शब्दाने  भूलवणे ,
शब्दाने  सावरणे,
शब्दात   हरवणे ,
                 कोणाचे  कोणाला ..

शब्दाने  ओरडणे ,
शब्दाने  ओरबाडणे ,
शब्दानेच  कुरवाळणे ,
                कोणाचे   कशाला …

शब्दांच्या  पत्रिका ,
अन  शब्दांचे  पत्र ,
प्रेम  पत्र  अन  श्राद्धाचे  बोलावणं …

शब्दांचे कोडे... 
कोड्यातील शब्द...
का शब्दच एक कोडे...
              अभेद्य चक्रव्यूव्हासारखे... 

आयुष्यातील आपल्या ... ही अनमोल शब्द गाथा...
शब्द्बद्धीत करून  मी अर्पण करतो तुझला...
                                                       ... श्रीहर्ष




Saturday, 24 September 2011

मोक्ष!!!

मोक्ष!!!
किती  दिवस  दुसर्यांच्या  जीवावर  जगायचं,  
किती  दिवस  फेकलेल्या  तुकड्यांवर  रहायचं…
अशा  जगण्यापेक्षा  तर  मरणच  पत्करायचा …,

लाथाडलेल्या  या  जीवाला  जाळून  टाकायचं ,
आक्रोश  करणाऱ्या  मनाला  पुरून  टाकायचं ..
आणि  संपउन  टाकायचं  सगळं ….

एका  झटक्यात  ठेचून  टाकायचं ,
माया  मद , मोह , मत्सर .. सर्वांना ….
भाबड्या  अशांना .. अन  फाजील  अपेक्षांना .,
अन  मुक्त  व्हावं  सर्वातून …..
पंच  महाभूतात  विलीन  व्हायला ……
                                                  
                             श्रीहर्ष ( कधीतरी २००७ मध्ये लिहिली होती... )


Tuesday, 20 September 2011

जखम!!!

जखम!!!
जखम नविन झाली तरी रक्त कही बदलत नाही ..
नविन रक्त बनले तरी त्याचे गुण कही बदलत नाहीत...

अजुनही दुखतेच ते.. तेवढ्याच वेदना देते..
वाहता वाहता आवेगात कधी तरी जखमच वाढउन जाते...

खपली धरण म्हणजे काय हे मला ठाउकच नाही ..
कारण जखम माझी जिथे ..तिथले रक्त गोठतच नाही  ...

गोठले तर बरच होइल .. एकदाच काय ते थांबेल...
रक्त वाहिनीत अडकून एखाद्या.. रोज तूटणार मन तरी मारेल...

आहे अश्या जगण्या पेक्षा ते नक्की बरे ठरेल..
निनावी या देहाला एक नाव 'प्रेत ' तरी मिळेल...

--- श्रीहर्ष जून २००९

Sunday, 11 September 2011

ती पाठमोरी आकृती

ती पाठमोरी आकृती ,
 झाकते पाणावलेले डोळे... 
पर वाढत्या अंतराची जाण  देते,

शोधते ती नजर थोडी अंधुक तरीही,
त्या मृगजळ क्षणांची साथ देते...

थमते हृदय .. होते अंधारी तरीही..
त्या हुंदक्यातच श्वासाचे भान येते...

                                     श्रीहर्ष  ( ११/०९/११

Wednesday, 7 September 2011

तुझ्याही रक्तात 'महाराज'

सांडलेले रक्त, विखुरलेली प्रेत ,
वीजलेल्या चुली अन पेटलेल्या चिता ...

किती हा संहार ... किती सहशील हे वार,
अहिंसेच्या तुझ्या मार्गावर केवळ तुझेच होतील हाल... 

सोड ती अहिंसा... अन उसळूदे ती तलवार,
पेटू दे हा वणवा आणि जळू दे सारी त्यात... 

हजार वर्षांचा इतिहास...संपवून  टाक हा वाद,
तुटलेल्या प्रेतांची शप्पथ तुला... आज जळू दे ही आग... 

              त्यांचे  पूर्वज मुघल जरी... तुझ्याही रक्तात 'महाराज'

                                                           श्रीहर्ष   ( ८त सेप्तेम्बेर २०११)

Monday, 5 September 2011

एक परदेश प्रवास आखला...


     एक परदेश प्रवास आखला...

टेबल खुर्ची आणि एक पलंग मांडला,
मी एक परदेश प्रवास आखला...
       घरकुलाची खोली झाली...
       'शेरिंग' ची सवय लागली...
       आईचा मी हात सोडला...
असा मी एक परदेश प्रवास आखला...

जेवणाच्या माझ्या 'बर्गर' झाला...
उपवास मी 'िप्स' वर भागवला...
रसाचा कसा काय 'कोक' झाला...
पण असाच मी एक परदेश प्रवास आखला...

भाषेचा मी त्याग केला...
मनाच्या माझाच धिक्कार केला..
कुणास ठउक कुठल्या याशा साठी...
मी हा परदेश प्रवास आखला...

नवीन माझा मी शोधायला..
जुन्याचा मी वध केला..
अस्तित्वाच्या या खेळात माझ्या...
मी माझाच बळी घेतला...
मी माझाच बळी घेतला...

                ... श्रीहर्ष ( १९/०९/२०१०)

Sunday, 4 September 2011

शोध आत्म्याचा


आपण अणि आपले प्रतिबिम्ब दोन्ही एकच आहे का??
आरश्यात दिसतो तो मी तसाच आहे का??
शांत.. अगदी हुबेहूब...मी करीन तेच करणारा..
नाही नाही तसा मी नाही... कारण पाण्यात तर तो मी विचलित होतो...
अंगावर शहारा अल्यासरखा...विजेचा झटका लागल्यासरखा...
एकदम थरथरतो ...
भांड्यावर रूप बदलतो...गोलाकार होतो...
गाल गुब गुबित होउन डोळे बारीक़ करतो...
तीक्ष्ण नाजेरेने इथे तिथे पाहतो...

कुठला मी खरा आहे कोण जाणे...
माझा मीच खरा नाही तर प्रतिबिंब  कसे सत्य असणार...
कोणी म्हणे प्रेमळ.. अबोल.. गुणी...
कोणी म्हणे.. नाटकी..बडबडडया..चीडका...

अरे ही तर विरुद्ध टोक...
म्हणजे माझ्याच विरुद्ध आहे का मी...
स्वतःशीच वाद घालणारा की स्वताहावर वार करणारा...

हा शोध आत्म्याचा... कधी संपणारा...
रथ दिसे अन रणांगन... पण सारथि हा... दिसणारा...

श्रीहर्ष (१५ फेब्रुवरी २००९)

Saturday, 3 September 2011

स्वप्न माझे सखी

The aim of writing this blog was also to bring all the old poems back in to light or atleast give those words a place of their own. Well also to avoid losing them as most were written on bits of paper.
 So for first few days, I will also upload some old poems. I hope you guys enjoy them....

स्वप्न माझे सखी 

स्वप्न माझे सखी तुझ्या प्रेमात मग्न होयचे.....
तुझ्या ओठांच्या स्पर्शाने पापणीचे ध्यान मोडायाचे..,

स्वप्न माझे सखी तुझ्या मिठीत हरवायचे...
कवेत तुझ्या गुंतून सर्व जग विसरायचे...

स्वप्न माझे सखी तुझ्या स्वप्नात गुंफायचे....
तुझ्या स्वप्न साकार्ण्यासाठी साठी... सर्वस्व अर्पण करायचे ...

                                                                 श्रीहर्ष ( फेब्रुवरी २०११)

Friday, 2 September 2011

गांधी वाद

आज देशात  अन परदेशात 
        गांधींचे अनेक पुतळे आहेत...
गांधी वादी तर दिसत नाहीत... 
       परंतु गांधी 'वादाचे ' अनेक मुद्दे आहेत...
                                        - श्रीहर्ष (३/९/११)