शब्द
शब्दात कथा ,
शब्दात कोडे ,
शब्दात कविता ,
तुझ्या अन माझ्या ...
शब्दाने भूलवणे ,
शब्दाने सावरणे,
शब्दात हरवणे ,
कोणाचे कोणाला ..
शब्दाने ओरडणे ,
शब्दाने ओरबाडणे ,
शब्दानेच कुरवाळणे ,
कोणाचे कशाला …
शब्दांच्या पत्रिका ,
अन शब्दांचे पत्र ,
प्रेम पत्र अन श्राद्धाचे बोलावणं …
No comments:
Post a Comment