आम्ही एन . आर . आय
दूर देशी, पांढर पेशी ...देश वीरांची एक जात आहे,
उष्ण रक्त अन् कठोर शब्द हेच त्यांचे अवजार आहेत...
भ्रष्टाचार, भारतीयांचे विचार, समाजातील कुप्रकार
तासन्तास घालातील वाद, कधी गांधी वाद कधी ठाकरे वाद...
भावना त्यांच्या मनी, पर भित्रे सारे रमुनी,
विदेशीचे घोट घेता, लढतात फसेबूक वर मिळुनी...
कीव त्यांची येते... नव्हे कीव स्वतःची येते,
पळपुट्या स्वभावाची, खोट्या आमच्या अहंकरची...
देश प्रेमाचा आव आणणार्यांची...
आम्हा सर्वांची... आम्ही ढोंगी देश प्रेमी एन . आर . आय
श्रीहर्ष
१ जुलाइ २०१२