जम्बो जेट
जंबो जेट जंबो जेट,
भर भर वाढला विमानाचा वेग;
फिरणार्या रीळीतून जगाचा वेध,
जणू खिडकीतच आखला सिनेमाचा बेत;
सरकते क्षण आणि नीसटणारी धरती,
बाहेरील कल्लोळातून तात्पुरती निवृत्ती;
दोन जगातील वाढते भेद,
हताश दुनिया अन् मनातील खेद;
डोंबार्याच्या जगाशी आता साधतो मेळ,
दोरीवरची कसरत आणि माकडाचा खेळ;
अलगद धक्का आणि सावरला हुंदका,
जशी जंगली प्राण्याची पिंजऱ्यातील व्यथा,
जसा सर्पाने जणू सरसावला फणा,
तसा नऊ तासांवर थांबलाय एकलेपणा .
१२/८/२०१३
श्रीहर्ष