Tuesday, 25 February 2014

काही चारोळया

काही चारोळया

प्रेमात ग्रासलेल्या या शब्दांच्या माळा,
हृदय विकाराने जडलेल्या या कविता सार्‍या...
कधी हा पडदा झुगारून तर पहा...
तुमच्या आद्न्येस गुम्फेल निसर्ग सारा...

                         श्रीहर्ष (२६/३/१४)




तुझ्या माझ्या प्रेमावर रचल्या अनेक कविता...
कवितेअंती मिलनाची वेळ जणू शाईतच विरून गेली.


अंधार परमसत्य

पेटवता  मेणबत्ती प्रकाश वरमला , 
म्हणाला, अंधारा ममी  तुझा नायनाट केला...
अंधाराने हसून हळूच फुंकर मारली !



Monday, 12 August 2013

जम्बो जेट

जम्बो जेट 

जंबो जेट जंबो जेट,
भर भर वाढला विमानाचा वेग;

फिरणार्‍या रीळीतून जगाचा वेध,
जणू खिडकीतच आखला सिनेमाचा बेत;

सरकते क्षण आणि नीसटणारी धरती,
बाहेरील कल्लोळातून तात्पुरती निवृत्ती;

दोन जगातील वाढते भेद,
हताश दुनिया अन् मनातील खेद;

डोंबार्‍याच्या जगाशी आता साधतो मेळ,
दोरीवरची कसरत आणि माकडाचा खेळ;

अलगद धक्का आणि सावरला हुंदका,
जशी  जंगली प्राण्याची पिंजऱ्यातील  व्यथा,
जसा सर्पाने जणू सरसावला फणा, 
तसा नऊ तासांवर थांबलाय एकलेपणा .  

                                                             १२/८/२०१३
                                                               श्रीहर्ष 

Wednesday, 1 May 2013

जय महाराष्ट्र!!!


जय महाराष्ट्र!!!

भारत वर्षी भगवा फड़कला, पसरली शिवरायांची गाथा,
प्राण सोडला पर देश राखला, आशिच शूर राणी लक्षीमीची कथा...

तरीहि अखला डाव केला मुंबई वर घाव, 'आपल्या' नेहरूनची कृपा,
संहराचा निशाण, महाराष्ट्राची शान... रक्तात त्या हुतात्मा चौक उभा ...

अखंड राहो महाराष्ट्र माझे... अखंड रहो माझी बोली,
अखंड माझी अस्मिता..माझी माय माउली मराठी...

                                    श्रीहर्ष (१ मे २०१३; चैत्र क्रु ६ )










Monday, 29 April 2013

नव्या शिखराची आस लागता...
मन कसे हे खट्याळ वागते...
कधी शूरवीर तर कधी भेदरलेले...
शरीरास पुरे गोंधळून टाकते... 
श्रीहर्ष

Tuesday, 26 March 2013

धन्य ती होळी!


रंगात रंग भेसळूनी,
चिखलात तन लोळूनी..
मद्यास मन विकुनी...
पेटवली होळीत मती...

कोरडे पडले अवघे राष्ट्र..
भेगाळलेल्या धरतीत करपले देह...
पिण्यासाठी सांडले रक्त...

आणि तरीही... तरीही...
तुम्ही, उधळलात गुलाल...मिसळलेत विष अन् नाशीलेत जीवन...
उपसलेत टॅंकर आणि नाचले तुमचे निर्लज्ज भक्त....
चिमूटभर हळद, आणि लोटाभर गोमूत्राच्या अमृतात!!!

धन्य धन्य.. तुम्ही... अन् तुमचे ढोंगी साधू...
अशा देवांपेक्षा आम्ही तर भुत्ास पुजू...


                                      श्रीहर्ष (२५ मार्च २०१३)








Tuesday, 13 November 2012

दीपावली


तेजोमय प्रहर अन् दिव्य पणत्यांची सांज,
फटाक्यांच्या अतिषबाजीत गाजेल ही रात..

फराळाचा भरभराट अन् तूपाचा घमघमाट,
आरंभ करू चार दिवसांची ही वरात...

एक एक किरण अर्पुन चला उजळू ही वाट,
वंदुनी अग्निस करू अंधाराचा नायनाट.
                                श्रीहर्ष (१३/११/२०१२)

!! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!