मोक्ष!!!
किती दिवस दुसर्यांच्या जीवावर जगायचं,
किती दिवस फेकलेल्या तुकड्यांवर रहायचं…
अशा जगण्यापेक्षा तर मरणच पत्करायचा …,
लाथाडलेल्या या जीवाला जाळून टाकायचं ,
आक्रोश करणाऱ्या मनाला पुरून टाकायचं ..
आणि संपउन टाकायचं सगळं ….
एका झटक्यात ठेचून टाकायचं ,
माया मद , मोह , मत्सर .. सर्वांना ….
भाबड्या अशांना .. अन फाजील अपेक्षांना .,
अन मुक्त व्हावं सर्वातून …..
पंच महाभूतात विलीन व्हायला ……
श्रीहर्ष ( कधीतरी २००७ मध्ये लिहिली होती... )
No comments:
Post a Comment