Tuesday, 24 April 2012

अचानक उफाळून आले आणि हे प्रेमाचे तळे साचले...
थेंब थेंब वेचले... आणि लवकरच ते आटले....

खत पाणी देऊन .. निगा राखून... वृक्ष ते बहरले...
पर हिवाळ्यातील  पानगळ ... भोवतालची लागण ... त्यास ते ही न चुके...

परतेल श्रावण .. वाहतील झरे.. वाहील तळे...फुलेल वृक्ष...
हीच रीत निसर्गाची त्यातून  अपुले छकुले कसे सुटे...

                                                         श्रीहर्ष (२४ एप्रिल २०१२)

No comments:

Post a Comment