सुटे आलिंगन पर नजर निरंतर,
थोडी अंधुक... साचलेला त्यात भावनांचा पूर...
बोट गुंफलेली दोघात ,
भोवतालीचे नाही आता भान...
मनी दोघांच्या एकच कल्लोळ...
स्पंदनातून उमटे एक बोल...
'आज... नको घेउस निरोप...'
शब्द रोखलेले, विश्व गोठलेले...
तुझ्या स्पर्शात आज सर्वस्व झोकलेले..
मूक वाचेतून विनविती डोळे...
वाहती भेदक आक्रोश...त्यातही तेच बोल...
'आज नको घेउस निरोप '
तरीही...हा असा काळ..
फिरविली पाठ, सुटला स्पर्श अन दाटले अश्रू...
थमला श्वास, निश्चल हृदय, त्यागला देह...
आणि साद घातली त्या गिधाडांना..
करा संहार, सोसेन मी वार...तुमचा शिकार...
निहत्ता, निर्मम आणि निर्विकार!!!
पर सदैव तेवेल तुझ्या प्रेमाची वात...!!!
श्रीहर्ष (९ एप्रिल २०१२)
No comments:
Post a Comment