तुझ्यासंग मैफिल जमली ,
तूच सखी , ती तुझ्यात वसलि,
तूच मनी, तू वाचेत सजली...
सोनेरी ते क्षण ... बहरवले आपण,
पण का कधी तू अशी दुरावत गेली...
परके हे जग , निर्बळ मी एक..
तुझ्यविणा जणू कवच कुण्डल हरपली.
दुरावा हा असह्य ... गोठले हे मन,
अश्रूंची गाथा गायला...हुन्द्क्यान्नहि आले एकटेपण.
मी तुझाच, तुजविण माझे प्रेम अधुरे...
माझे दैवत माझी वाचा..
माझे मन.. तू घे मला कवेत...
दे आलिंगन...परत येऊ दे तुझ्या सेवेत...
माझी कविता.... माझी माऊली.
श्रीहर्ष (१७ मार्च २०१२ )
No comments:
Post a Comment